राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विद्यमान उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत त्यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हातकणंगले पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भरारी पथक क्रमांक तीनचे प्रमुख मेघराज घोडके यांनी फिर्याद दिली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी प्रचार सुरू केला आहे. याच मतदारसंघात हेरले इथं ग्रामपंचायतीसमोर 2 एप्रिलला झालेल्या सभेत शेट्टी यांनी सीमेवर आमची पोरं जातात, कुण्या देशपांडे-कुलकर्ण्याची नाहीत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्‍ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत, शेतकऱ्यांचीच मुले सैन्यात असतात, असे वक्‍तव्य केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.