राजू शेट्टी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राजू शेट्टी यांचा आरोप बिनबुडाचा – अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर

कोल्हापूर- शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मतदानात फेरफार झाल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. झालेले मतदान आणि मोजलेली मते यांच्यात विसंगती नाही. वाढीव दिसत असलेले मतदान मतमोजणीच्या दिवशीची “क्‍लेरीकल मिस्टेक’ असू शकते असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले आहे.

सलग 2 वर्ष खासदार असलेले राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांनी 95 हजार 765 मतांनी पराभव केला आहे. परंतु आता खासदार राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्याचा प्रकार उघड झाल्याच सांगण्यात येत आहे. हा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टींच्या मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते आढळली आहेत . अशी तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्यात आली आहे. हातकणंगले मतदार संघात 12 लाख 45 हजार 797 इतक्‍या लोकांनी मतदान केले होते. मात्र मतमोजणीच्या दिवशी 12 लाख 46 हजार 256 इतकी मतांची मोजणी झाली आहे.

459 इतकी अधिकची मते आलीत कोठून असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. शेट्टी यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी केंद्रावर दिसून येणाऱ्या वायफाय बाबत आक्षेप घेतला होता.त्यातच आता मतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मतदानात फेरफार झाल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलंय.झालेले मतदान आणि मोजलेली मते यांच्यात विसंगती नाही.वाढीव दिसत असलेले मतदान मतमोजणीच्या दिवशीची क्‍लेरीकल मिस्टक असू शकते .असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिलंय. राजू शेट्टी याना याबाबत लेखी कळवण्यात येणार असून त्यांची ही शंका दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी यांचा गैरसमज झाल्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएम मध्ये कोणतीही तफावत नसल्याचेही नंदकुमार काटकर यांनी स्पष्ट केले. एकूणच ईव्हीएम वर देशभर प्रश्नचिन्ह उभे केले जात असताना कोल्हापुरात मतांच्या मोजणीत फरक पडल्याच्या राजू शेट्टी यांच्या तक्रारीवर आता प्रशासनाने उत्तर देत पडदा टाकला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×