* मी पण कोरोना योद्धा
* कुटुंबासह शेतात उभे राहून राजू शेट्टींनी केला शेतकऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र तरीही या परिस्थितीमध्ये शेतकरी लढतोय आणि धान्य पिकवत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज देशभर शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या कुटुंबासह शेतात उभे राहत “कोरोना अन्नदाता योद्धा” अशा घोषणा देत शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी १६ मे हा दिवस अखिल भारतीय किसान समितीने जाहीर केल्या प्रमाणे ‘शेतकरी सन्मान दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाच्या परिस्थिती शेतकरी प्रत्येक पातळीवर लढत आहे, नुकसानातही शेती करत आहेत.जीव धोक्यात घालून शेतकरी आपल्या शेतात जाऊन काम करतोय आणि धान्य पिकवत आहेत.
जगाचा हा अन्नदाता असणाऱ्या या शेतकरयाचा ही सन्मान झाला पाहिजे, म्हणून ‘शेतकरी सन्मान दिवस’ आज साजरा करण्यात आला.कोल्हापूरच्या शिरोळ मध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या शेतात सह कुटुंब शेती औजारे घेऊन, शेतकरी सन्मानाच्या घोषणा देत. शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. यावेळी शेतातील मजुरांनी हातात खुरपे घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानाची साद दिली.