राजू शेट्टी यांची आंदोलनाची हाक

कोल्हापूर/प्रतिनिधी – माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध उत्पादक शेतकरऱ्यावर होणाऱ्या अन्यायच्या विरोधात आंदोलनाची हाक दिलीय. राज्य आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी 21 जुलै ला राज्यातील सर्व दूध संकलन बंद करणार करण्यात येणार असल्याचे ची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.
GST मागे घ्यावा, राज्य सरकारने 5 रुपये शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा , निर्यात अनुदान 30 रुपये द्यावं यासह अन्य मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहेत.
आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही मात्र आम्हाला आमचं दूध विकायचं नाही, आम्हाला आमचं दूध संकलन करायचं नाही ही आमची भूमिका आहे. दूध उत्पादकांनी आम्हाला सहकार्य करावं करणं दूध उत्पादकाच्या जीवावर तुमचा धंदा चालतोय याच भान ठेवावा.. दूध संघाणीही आपलं दूध संकलन बंद ठेवावं आणि सहकार्य करावे अस देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.




