राजस्थानला भाजपच हवा आहे – मोदी

जयपुर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानात आज पुन्हा एकदा प्रचार दौऱ्यावर येत आहेत या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज आपल्या तेथील शेवटच्या सभेतील काही व्हिडीओ क्षणचित्रे आपल्या ट्विटर अकौंटवर प्रसारीत केली. या सभेत मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर राजस्थानातील जनतेला पुन्हा भाजपच हवा आहे असे स्पष्ट दिसते असे विधानही त्यांनी त्यात केले आहे.

जयपुर येथील सभेच्यावेळी उपस्थित जमावाने मोबाईल फोनचा प्रकाश झळकाऊन मोदींना प्रतिसाद दिला होता. त्याचा हा व्हिडीओ आहे. यावरून लोकांच्या मूडचा अंदाज येतो आहे, त्यांना आता पुन्हा भाजपच हवा आहे असे यातून स्पष्टपणे दिसे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आज आपल्या राजस्थानातील हिंदौन, सिकार, आणि बिकानेर येथे सभा होत आहेत अशी माहितीही मोदींनी यात दिली आहे. राजस्थानात अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला हरवून कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. त्यामुळे भाजपसाठी हे राज्य आता अधिक आव्हानात्मक बनले असून त्याचदृष्टीने भाजपने येथे मोदींच्या अधिक सभा आयोजित केल्या आहेत. या राज्यात एकूण 25 जागा असून त्यातील 13 जागांसाठी गेल्या 29 एप्रिल रोजी मतदान झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.