हिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती

नवी दिल्ली : शंभू लाल रायगर या माथेफिरूने गतवर्षी अफराजुल खान नामक एका मुस्लिम इसमास जिवंत जाळत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचं चित्रण सोशल माध्यमांवर व्हायरल केलं होत. सदर व्हिडिओमध्ये माथेफिरू शंभू लाल रायगर हा धर्माने मुस्लिम असलेल्या अफराजुल खानला तो ‘लव्ह जिहाद’ करीत असल्याने त्याच्या पापांची सजा देत असल्याचे म्हणताना आढळला होता.

राजस्थानात घडलेल्या या हत्याकांडानंतर देशभरामधून या अमानवी कृत्यावर परखड टीका देखील करण्यात आली होती. दरम्यान, आज राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरु असताना अजूनही इंटरनेटवर सर्रास उपलब्ध असलेल्या या व्हिडिओबाबत फटकारले असता, आपण गुगलकडे हा व्हिडीओ इंटरनेटवरून हटविण्याची मागणी करणारे पत्र पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.