राजपाल यादव पुन्हा बनणार “छोटा पंडित’

बॉलिवुडमधील कॉमेडियन राजपाल यादव लवकरच आपल्याच सुपरहिट चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना गुदगुल्या करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो कार्तिक आर्यनसोबत काम करत आहे. या भूमिकेविषयी स्वतः राजपाल यादवने अनेक धमाकेदार असे खुलासे केले आहेत.

आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता राजपाल यादवने आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने सांगितले की, अक्षय कुमारच्या “भूल भुलैया’ या चित्रपटाचा दुसरा भाग “भूल भुलैया-2′ साकारण्यात येत आहे. यात तो आपल्या जुन्या पात्राची पुढील भूमिका नव्याने साकारणार आहे.
2007मध्ये प्रदर्शित झालेल्या “भूल भुलैया’मध्ये राजपाल यादवने नटवर उर्फ छोटा पंडितची भूमिका साकारली होती. त्याच्या दुसऱ्या भागातही राजपाल यादव त्याच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. शेवटच्या वेळी त्याने अक्षय कुमारला त्रास दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार आता राजपाल यादव बऱ्याच दिवसांपासून कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

राजपाल यादवने शूटिंग सुरू केले असून अन्य स्टार्स शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. आतापर्यंत चित्रपटाची अनेक पोस्टर्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये कार्तिक आर्यन अक्षय कुमारच्या गेटअपमध्ये दिसला आहे.
दरम्यान, 2007मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमारच्या “भूल भुलैया’ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यात विद्या बालन, शाइनी आहुजा, परेश रावल, राजपाल यादव, अमीषा पटेल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर “भूल भुलैया-2’मध्ये कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा आडवानी, राजपाल यादव आदी कलाकार अभिनय साकारत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.