राजमाता जिजाऊ साहेब यांची 422 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी

सिंदखेड राजा : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ साहेब यांची 422 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली. 8 वे लखोजीराजे यांच्या वाड्यामध्ये जिजाऊ जन्मस्थळावर मान्यवरांनी अभिवादन केले.

त्यानंतर आज मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती युवराज खासदार संभाजी राजे यांना मानाचा पुरस्कार देण्यात आला. शिवधर्मपिठावर सकाळपासूनच विविध धार्मिक पोवाडे, गीत संगीत यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पुस्तक विक्रीची दालने उघडण्यात आली होती.

या ठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने जिजाऊ प्रेमी बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथे आले होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या माळी समाज संघटनेने जिजाऊ साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. माळी समाज महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुधा चौधरी यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.