Rajkummar Rao : अभिनेता ‘राजकुमार राव’ने बॉलिवूडमध्ये टॉपच्या कलाकारांबरोबर काम करून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच हटके रोल निवडला आहे. “स्त्री 2 ’मध्ये त्याच्या रोलला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती.
राजकुमार राव ‘स्त्री 2’ चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत मुख्यभूमिकेत झळकला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. याशिवाय त्याच्या ‘श्रीकांत’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’ आणि ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.
बॉलिवूडचा अष्टपैलू सुपरस्टार, त्याच्या अविश्वसनीय अभिनयासाठी आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी यशासाठी ओळखला जातो. आणि यासाठीच त्याला वी द वुमन एशिया अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित ‘मॅन ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले आहे.
सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त करताना, अभिनेत्याने लिहिले, “मला वर्षातील सर्वोत्तम पुरुष पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल @wethewomenasia धन्यवाद आणि मला त्यांचे आवडते बनवल्याबद्दल सर्व सुंदर महिलांचे आभार.” असं तो म्हणाला आहे.
View this post on Instagram
राजकुमारच्या या वर्षाच्या प्रवासाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रशंसनीय प्रतिभांपैकी एक म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत केले आहे. त्याच्या ऑन-स्क्रीन परिवर्तनांपासून ते त्याच्या आकर्षक ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्त्वापर्यंत, तो जगभरातील मने जिंकत आहे.
त्यामुळेच राजकुमार हा महत्त्वाकांक्षी अभिनेत्यांसाठी एक प्रेरणा आणि चाहत्यांचा आवडता बनला आहे. दरम्यान, लवकरच राजकुमार राव आगामी ‘मालिक’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील राजकुमारचा फर्स्ट लूक समोर आला असला तरी अद्याप रिलीज डेटची घोषणा करण्यात आलेली नाही. स्त्री 2 चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा ‘स्त्री’चा सीक्वल होता.
या चित्रपटात श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, सुनील कुमार, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले होते. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती.