धर्मेंद्रनी केलेल्या रोलमध्ये राजकुमार राव

राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये टॉपच्या कलाकारांबरोबर काम करून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच हटके रोल निवडला आहे. “स्त्री’मध्ये त्याच्या रोलला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. आता जुन्या जमान्यातील “चुपके चुपके’च्या रिमेकमध्ये राजकुमार राव असणार आहे.

जुन्या “चुपके चुपके’मध्ये धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ, जया आणि ओमप्रकाश यांची धमाल कॉमेडी होती, ती अजूनही प्रेक्षकांना आठवत असेल. मूळ रोलमध्ये धर्मेंद्रने ओमप्रकाशची फजिती करण्यासाठी हा रोल अप्रतिम वठवला होता. धर्मेंद्र यांनी केलेल्या त्याच रोलसाठी राजकुमार रावची निवड करण्यात आली आहे. भुषण कुमार आणि लव्ह रंजन यांच्या प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये राजकुमारला कॉमेडीसाठी भरपूर स्कोप असणार आहे. त्याचा कॉमिक टायमिंक भन्नाट आहेच.

आता वनस्पती शास्त्राचा प्रोफेसर परिमल त्रिपाठी उर्फ प्यारेलाल हा शुद्ध हिंदीच्या वापराने काय काय धमाल करतो हे लवकरच बघायला मिळेल. त्याचबरोबर इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या अमिताभ यांना जेंव्हा वनस्पती शास्त्र शिकवायची वेळ येते तेंव्हा काय गंमत होते, हे देखील प्रेक्षकांना आठवत असेल. या सिनेमातील अन्य टीमचे सदस्य कोणकोण आहेत आणि “चुपके चुपके’चे शुटिंग सुरू कधी होणार आहे, हे लवकरच समजेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.