बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा आगामी “रूही अफजाना’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. कधी कास्ट, तर कधी चित्रपटाच्या कथानकावरून त्याला प्रसिद्धी मिळत आहे. आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.
“रूही अफजाना’चे नाव बदलून “रूही’ असे नवीन नाव निश्चित करण्यात आले आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. “रूही’चा पहिला टीझरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच चित्रपटाच्या रिलीज डेटही घोषणा करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी केले आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यापूर्वी राजकुमार राव याच्या “स्त्री’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. टीझर शेअर करत जान्हवीने लिहिले की, या भूतिया लग्नामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चित्रपटगृहात पुन्हा एकदा जादू दिसून येणार आहे. या टीझरमध्ये जान्हवी कपूर ही नववधूच्या रूपात दिसून येत आहे. तर राजकुमार आणि वरुण हे नवरदेवाच्या वेशात दिसत आहे.