ममतांच्या मंत्रिमंडळातून आणखी एका मंत्र्याचा राजीनामा

वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

कोलकाता, दि. 22 – पश्‍चिम बंगाल मधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे, पण राजीनाम्याचे कारण मात्र त्यांनी दिलेले नाही. या राजीनामा पत्रात त्यांनी मंत्रिमंडळात संधी मिळाल्यामुळे राज्यातील जनतेची व पश्‍चिम बंगालची सेवा करण्याची उत्तम संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

बॅनर्जी यांनी अलिकडेच पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी या राजीनाम्याची एक प्रत थेट राज्यपालांकडेही पाठवली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा पक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तृणमुल मध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. मात्र बॅनर्जी यांनी आपण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार आहे किंवा कसे हे मात्र अजून स्पष्ट केलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.