लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांची माघार

चेन्नाई – दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयी आपले मौन सोडले असून त्यांनी या निवडणूकीतून माघार घेतली आहे. आपण ही निवडणूक लढवणार नाही किंवा अन्य कोणत्याही पक्षाला आपण पाठिंबा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तामिळनाडु किंवा दक्षिणेकडील निवडणूकीत आता रजनीकांत हा फॅक्‍टर असणार नाही.

काही दिवसांपासून रजनीकांत हे राजकारणात येण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांनी त्याविषयीची आपली भूमिका अजून निश्‍चीत केलेली नाही. त्यांच्या राजकारण प्रवेशाविषयी लोकांच्या मनात खूप औत्स्युक्‍य आहे. त्यांच्या समर्थकांनीही त्यांच्या पाठिंब्यासाठी मोठी तयारी केली होती पण त्यांनी अद्याप पर्यंत कोणताच निर्णय न घेतल्याने त्यांचे पाठिराखे त्यांची साथ सोडून चालले असल्याचे तेथील चित्र असतानाच त्यांनी या निवडणूकीतून माघार घेण्याची घोषणा केल्याने त्यांच्या भविष्यातील खेळी विषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत.

त्यांनी सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पुर्ण राजकारणातून मात्र त्यांनी माघार घेतलेली नाही. किंवा विधानसभा निवडणुकीविषयी मात्र त्यांनी अजून आपली भूमिका निश्‍चीत केलेली नाही. डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. व त्यांनी रजनी मक्‍कल मंदरम ही संघटनाही स्थापन केली होती. रजनीकांत यांच्या राजकारण भूमिकेवर भाजपचे तामिळनाडुतील गणित अवलंबून होते. आता त्यांच्या या निर्णयानंतर तामिळनाडुत अद्रमुक आणि भाजप यांच्यातील युती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.