रजनीकांत-कमल हासन लवकरच दिसणार एकत्र

मुंबई – भारतीय सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार ‘रजनीकांत’ आणि ‘कमल हासन’ लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत. यापूर्वी या दोघांनी १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर तब्ब्ल ३५ वर्षांनी पुन्हा एकदा हे दोन सुपरस्टार एकत्र चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कानगराज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आगामी चित्रपटात रजनीकांत व कमल हासन पुन्हा एकदा एकत्र येणार असे सांगितले आहे. मात्र, त्यांनी या चित्रपटाचे नाव, कथानक किंवा रजनीकांत व कमल हासन यांच्या भूमिकेंबाबत कुठल्याही स्वरुपाची माहिती दिली नाही.

सध्या कमल हासन आपल्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे रजनीकांत देखील आगामी ‘दरबार’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.