Rajinikanth | Amitabh Bachchan : टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित रजनीकांत स्टारर ‘वेट्टियान’ या चित्रपटातील पात्राची सध्या चर्चा होत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनीत मोस्ट अवेटेड कॅरेक्टरचे पोस्टर रिलीज केले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक धमाकेदार प्रोमो जारी केला, ज्यामध्ये सत्यदेवच्या भूमिकेत बिग बी दिसत आहे.
‘वेट्टियान’च्या निर्मात्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिग्गज सुपरस्टार त्याच्या कुर्ता आणि पश्मिना शाल लूकमध्ये दिसत आहे. एका शॉटमध्ये, अभिनेता त्याचा मित्र आणि सहकलाकार रजनीकांतसोबत गप्पा मारताना दिसतो. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित पुनर्मिलन 32 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर होणार आहे.
आता नुकताच रजनीकांत यांनी बिग बीबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. रजनीकांत यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात अत्यंत वाईट काळ बघितला आहे. अमिताभ यांच्याकडून त्यांच्या सुरक्षारक्षकाला देण्यासाठीही साधे पैसे नव्हते. त्यांचा जुहूवाला बंगला देखील विक्रीसाठी होता. पूर्ण बॉलिवूड त्यांच्यावर हसत होते.
पण तीन वर्षांमध्ये त्यांनी सर्वकाही बदलून टाकले. जाहिराती आणि केबीसी त्यांनी केले. त्यांनी खूप सारे पैसे कमावले. अवघ्या तीन वर्षांमध्ये त्यांनी परत त्यांची घरे मिळवली. जुहूच्या त्याच रोडवर त्यांनी अजून एक घर खरेदी केले. ते खरोखरच माझी प्रेरणा असल्याचेही रजनीकांत यांनी म्हटले. 82 वर्षांचे असूनही ते तब्बल दहा तास काम करत असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले.
रजनीकांत आणि अमिताभ बच्चन याआधी ‘अंधा कानून’ (1983), ‘गिरफ्तार’ (1985) आणि ‘हम’ (1991) या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. ‘हम’ पासून, दोन्ही स्टार्सनी एकत्र काम केले नाही, त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी ‘वेट्टियाँ’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट बनला आहे.
लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय राणा डग्गुबती, फहद फाझिल, मंजू वॉरियर, दुशारा विजयन, रितिका सिंग, जीएम सुंदर, रोहिणी, राव रमेश, रमेश थिलक, रक्षा आणि इतर स्टार्स आहेत. हा एक कॉप ड्रामा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. ‘वेट्टियाँ’ 10 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.