राजगुरूनगर : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक

'कांद्याच्या माळा' घालून केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी : खेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन

राजगुरूनगर (पुणे) – “गळ्यात कांद्याच्या माळा’ घालून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.

यावेळी राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या नेत्या विजया शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, सदस्य भगवान पोखरकर, सुनिता सांडभोर, सुरेश नंदा कड, किरण गवारे, बापुसाहेब थिटे, लक्ष्मण जाधव, एल, बी तनपुरे, पांडुरंग गोरे. शहर प्रमुख दिलीप तापकिर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनचे कार्यकत्ये उपस्थित होते. दरम्यान नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना निवेदन देण्यात आले. 

खेड तहसील कार्यालयासमोर आंदोलनराजगुरूनगर : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याबद्दल गळ्यात कांद्याच्या माळा घालून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करुन तहसीलदार कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.

Posted by Digital Prabhat on Wednesday, 16 September 2020

लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना या आठवड्यात कांद्याला 3 हजार ते 4 हजारपर्यंत उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कांदा निर्यात बंदी तात्काळ न उठल्यास करोनाच्या गंभीर परिस्थितीही पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.