बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास करा

दिलीप मोहिते : हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालयात “विद्यार्थी अभिरूप संसद’

राजगुरूनगर  – बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास कायद्याच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे, विधी महाविद्यालय, राजगुरूनगर येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत विद्यार्थी अभिरूप संसद या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते “व्हाईस ऑफ जस्टीस’ (voice of Justice) या वार्षिक अंक प्रकाशन करण्यात आले, तसेच या कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य, मॉडर्न विधी महाविद्यालय, पुणेच्या प्राचार्य डॉ. सुनिता आढाव, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण शिंदे, डेहणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मुळूक, रत्नाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार, ऍड. महादेव घुले, प्रा. राणी चव्हाण, प्रा.राजाराम गरुड, प्रा. नीलिमा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थी अभिरूप संसद या अभिनव उपक्रमात राष्ट्रपतींच्या शपथविधीपासून ते विधेयकाचे कायद्यात रूपांतर करेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया दाखविण्यात आल्या. तर प्रश्‍नोत्तर सत्रात विविध प्रश्नांनी विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले, सत्ताधारी पक्षातील मंत्रिमंडळाने त्याला तितक्‍याच समर्पकपणे उत्तर दिली. संसदप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून आरक्षण विधेयक व समान नागरी कायदा विधेयक संसदेत मांडून त्यावर चर्चा करण्यात आली. ती विधेयक पास झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी सहीदेखील करून कायद्यात रूपांतर केले. संसदेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

सिद्धिका लांडगे, सोनाली मुळूक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजाराम गरूड, रा.से.यो. अधिकारी प्रा. विकास बनसोडे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण शिंदे, सूत्रसंचालन प्रा. नीलिमा पाटील यांनी करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)