-रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील मुदत संपलेल्या राजगुरुनगर आणि चाकण नगरपरीषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची बिगुल वाजल्याने करोना महामारीच्या काळात वळचणीला गेलेले राजकीय पक्षांनी आता कान टवकारले आहेत. दोन्हीही नगर परिषदांच्या निवडणुकीची दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजु लागल्याने इच्छुक आता तयारीला लागले आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या वर्चस्व असणाऱ्या सत्तेत भाजपाला हटविण्यासाठी महाआघाडीचे संकेत मिळणार की राष्ट्रवादी आपले घोडे दामटणार याची उत्सुकता ताणली जाणार आहे.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या राज्यभरातील निवडणुकांचा हंगाम संपताच आता सहकारच्या क्षेत्रांच्या आणि नागरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहे. शासनाने सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्याने आता राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची धावपळ सुरू झाली आहे. करोनाच्या काळात आणि नगर परिषदांवर प्रशासक येताच अनेक नगरसेवक नागरिकांना सेवा सुविधा देण्यापासून गायब झाले होते तर इच्छुक उमेदवारही जनतेमध्ये नव्हते. मात्र आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होतातच भावी नगरसेवक कमला लागले असून प्रभागात फेरफटका मारत विकासकांमापेक्षा गैरसोयीच्या समस्यांचा आढावा घेऊ लागले आहेत.
राज्यातील 13 नगर परिषद आणि 82 नगरपंचायतीचे प्रभागनिहाय मतदार याद्या करण्याचे निर्देश जाहिर झाल्याने एप्रिल आणि मे दरम्यान निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगर परिषद 15 मे 2020 तर चाकण नगर परिषद 23 नोव्हेंबरला मुदत संपून प्रशासक आहेत. या नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती झाल्या असताना निवडणुकीचे वेध लागले होते.
विधानसभा निवडणूक मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार
विधानसभा निवडणूक मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. जानेवारी 2021 ची मतदारांना मतदानाचा हक्का मिळणार आहे. नगर परिषद हद्दीतील मतदार यादित अनेकदा आजुबाजुच्या गावातील नावांचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असतो. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय मतदार यादीनिमित्ताने समोर आले होते.
निवडणुकीचा कार्यक्रम :
दि. 15 फेब्रुवारी : प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध
दि. 15 ते 22 फेब्रुवारी : प्रारुप मतदारयादीवर हरकती सूचना घेणे
दि. 1 मार्च : प्रभागनिहाय मतदारयादी अधिप्रमाणिकरण करून प्रसिद्ध करणे
दि. 8 मार्च : मतदानकेंद्राची नावांची यादी आणि केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे
…राजकीय पक्षांनी कान टवकारले
खेड तालुक्यातील मुदत संपलेल्या राजगुरूनगर आणि चाकण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची बिगुल वाजल्याने करोना महामारीच्या काळात वळचणीला गेलेले राजकीय पक्षांनी आता कान टवकारले असून इच्छुक भावी उमेदवार आता निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र शहरात चौकाचौकात आता दिसु लागले आहे.
तक्रारींचा निपटरा करणे आवश्यक
चाकण आणि नगर परिषदेच्या शिवेवरच्या गावातील मतदारांची नावे नगर परिषद हद्दीत गेल्याच्या तक्रारी महसूल यत्रंणेकडे प्राप्त झाल्या होत्या. महसूल यत्रंणेबरोबरच नगर परिषद प्रशासनाने डोळेझाक न करता आलेल्या तक्रारींचा वेळीच निपटारा करणे आवश्यक आहे.