राजगुरूनगर – शहरात कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. राजगुरूनगर शहरात कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. मेडिकल वगळता व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
तालुक्यात परदेशी वारी करून आलेल्या 19 जणांवर व त्यांच्या संपर्कात आलेल्या 48 जण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. यापैकी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह नाही. शहरात कडकडीत बंद असला तरी नागरिक ये-जा करीत असल्याने पोलीस विभागाकडून जनजागृती करून गर्दी पांगवली जात आहे. पोलिसांच्या गाडीतून आवश्यक सूचन देण्यात येत असून प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे.