राजगोपाल यांचे न्यायालयासमोर समर्पण 

चेन्नई – साऊथ इंडियन पदार्थांच्या सर्वना भवन या हॉटेलांच्या शृंखलेचे मालक पी राजगोपाल यांनी एका खून खटल्या प्रकरणी सत्र न्यायालयासमोर समर्पण केले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा या साठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी समर्पण केले.

राजगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आरोग्य संदर्भात तक्रारी असल्याने न्यायालयात उपस्थित रहाण्यास ऍम्ब्युलन्सने येउ देण्याची परवानगी मागितली होती. त्यांना ही परवानगी दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात ऍम्ब्युलन्सने येणे पसंद केले. राजगोपाल याला आपल्याच हॉटेल मधील कर्मचाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून या प्रकरणी त्याने 7 जुलै रोजी न्यायालयासमोर समर्पण केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here