Rajesh Tope meets Manoj Jarange । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचा त्यांचा आजचा नववा दिवस आहे. त्या अगोदर गावात मध्यरात्री राजकीय हालचालींना वेग आला असल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी अचानक मनोज जरांगे यांची भेट घेतली. ते काहीवेळ स्टेजवर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले होते. या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही, याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली.
मनोज जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी Rajesh Tope meets Manoj Jarange ।
राजेश टोपे यांनी मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते.
जरांगे यांची प्रकृती खालावली Rajesh Tope meets Manoj Jarange ।
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मनोज जरांगे यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालणे आणि एका जागेवर बसणेही कठीण झाले आहे. शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने मनोज जरांगे यांना चक्करही येत आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील हे वैद्यकीय उपचार घ्यायला तयार नाहीत.
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
हेही वाचा