Rajesh Tope And Laxman Hake| लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मागील काही दिवसांपासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. त्यापूर्वी शनिवारी सकाळी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.
त्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे आहे. कुठेही समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशा स्वरुपाने हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज याठिकाणी आलो. आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र हा साधूसंतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि समाजसुधारकांचा आहे. त्यामुळे कोणताहीतेढ निर्माण होऊ नये, असे मला वाटत आहे,” असे राजेश टोपे यांनी सांगितले. Rajesh Tope And Laxman Hake|
दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला देखील राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश या शिष्टमंडळात असणार आहे. हे दुपारी 2 वाजता वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे.
लक्ष्मण हाकेंच्या मागण्या कोणत्या ?
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही, लेखी आश्वासन द्या, कुणबी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढा, सगेसोयऱ्यांची व्याख्या स्पष्ट करा, अध्यादेशाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी, ओबीसी आरक्षणासाठीचा कोटा कमी करू नका, ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतर दिलेली प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसींचं 29 टक्के आरक्षण अबाधित राहील हे सांगावं, ओबीसी-सगेसोयऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करा.
हेही वाचा:
विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांचे टेन्शन वाढणार; आमदार करणार शरद पवार गटात प्रवेश ?