मुंबई – आरोग्य मंत्रालयातर्फे आज बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी-नुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ४३,६५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी तब्बल ४ महिन्यांनंतर २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या बाधितांचा आकडा प्रथमच ३० हजारांच्या आत आला होता. मात्र आज (बुधवारी) उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णसंख्या मंगळवारच्या रुग्णसंख्येपेक्षा ४७ टक्क्यांनी अधिक आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.
राजेश टोपे यांनी याबाबत भाष्य करताना, “केरळ येथे रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीकडे देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून पाहिलं जाऊ शकत. महाराष्ट्रामध्ये आम्ही यासाठी तयारी करत आहोत. केंद्र सरकार व आयसीएमआर तज्ज्ञांच्या सूचनांनुसार आम्ही बालकांमधील करोना प्रादुर्भावाबाबत विशेष तयारी करत आहोत. आम्ही ऑक्सिजन बेड्स, वैद्यकीय कर्मचारी व औषधांची जुळवाजुळव करून ठेवली आहे.” अशी माहिती दिली.
The surge in cases in Kerala can be seen as the beginning of the third wave. In Maharashtra, we are preparing for it. According to the govt and ICMR we’ve laid emphasis on pediatrics. We’ve kept oxygen, beds, medical staff& medicines prepared: Rajesh Tope, Maharashtra Health Min pic.twitter.com/g8mkWHmaPO
— ANI (@ANI) July 28, 2021
दरम्यान, “महाराष्ट्रात करोना बाधितांचे व करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यासाठी जलद गतीने लसीकरण करणे गरजेचे आहे, यासाठी आम्हाला केंद्र सरकारने अधिक प्रमाणात करोना लसी उपलब्ध करून द्यायला हव्यात. लसीकरण वेगाने झाल्यास तिसऱ्या लाटेस अटकाव करणे शक्य होईल.” असं देखील टोपे यांनी सांगितलं.
We should receive a supply in vaccines because most cases are found in our state and the death rate is also high. We want to immunize the people as soon as possible. In this way, the effect of the third wave in the state would be less: Rajesh Tope, Maharashtra Health Minister pic.twitter.com/9IE4QDqXMm
— ANI (@ANI) July 28, 2021
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये आढळून आलेल्या ४३,६५४ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळ येथे सापडले आहेत. केरळ येथे गेल्या २४ तासांमध्ये २२,१२९ रुग्ण आढळले. केरळ, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये देशात सापडणाऱ्या एकूण करोना रुग्णांच्या ५० टक्के रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ६,२५८ तर कर्नाटकात १,५०१ रुग्ण आढळून आले.