लोणी काळभोर, (वार्ताहर)– येथील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र हनुमंत करणकोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे.
राजेंद्र करणकोट यांनी जोडभावी पोलीस ठाणे (सोलापूर) व पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. करणकोट हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
आपल्या ’सिंघम’ स्टाइल कामांमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाही आता चाप बसणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव 20 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या आहेत. त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे.