विविध स्पर्धांतून वातावरण मराठीमय : जुन्नर पंचायत समितीचा पुढाकार
जुन्नर – मराठी सारस्वताच्या साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत कवी, कादंबरीकार, कथालेखक, नाटककार, साहित्य क्षेत्रातील शुक्रतारा विष्णू वामन शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी राजभाषा मराठी गौरव दिनाचे आयोजन पंचायत समिती जुन्नरच्या वतीने गोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले होते.
यानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे पूजन गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या हस्ते करून ग्रंथदिंडीस टाळ- मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबामाउली-तुकाराम या जयघोषात, तसेच “मराठी भाषेची थोरवी सांगत’, घोषवाक्य फलक हाती घेऊन घोषणा देत मराठीचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती जुन्नरचे सभापती विशालजी तांबे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश प्रतिमा, विद्यादेवता सरस्वती प्रतिमा, कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर पंचायत समितीतर्फे कथाकथन, नाट्यवाचन, निबंधलेखन स्पर्धा लहान व मोठ्या गटात घेण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- निबंध लेखन – लहान गट – प्रथम – निवेदिता मुळूक (शाळा बेल्हे नं. 1), द्वितीय – मानसी रोकडे (कळमजाई), तृतीय – आशिता महाकळ (मांदारणे), निबंधलेखन – मोठा गट – प्रथम – श्वेता मुकणे (खडकुंबे), द्वितीय – सिद्धेश खोकराळे (हिवरे तर्फे नारायणगाव), तृतीय- श्वेता राठोड (खामुंडी). कथाकथन स्पर्धा – लहान गट – प्रथम – ओम आरोटे (ओतूर नं. 1), द्वितीय – वेदिका जाधव (येडगाव), तृतीय- कृष्णा गहिने (खोडद), कथाकथन – मोठा गट प्रथम – ओंकार सरोगदे (खडकुंबे), द्वितीय – सिद्धी देवगुणे (हिवरे खुर्द), तृतीय – दिव्या वाबळे (गोळेगाव), नाट्यवाचन- लहान गट – प्रथम – खडकुंबे शाळा, द्वितीय – प्रांजळ सरजिने (अलदरे), तृतीय – जयश्री बोकड (भोईरवाडी), मोठा – प्रथम – सानिया उतर्डे (आपटाळे), द्वितीय – दिया कराळे (कुसूर), तृतीय – अनुजा काशिद (चिंचोली).
विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे, गोळेगावच्या सरपंच शारदा लोखंडे, लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सचिव शंकरराव ताम्हाणे, विस्तार अधिकारी किसन खोडदे, अनिता शिंदे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गीतेश लोखंडे यांच्या हस्ते व केंद्रप्रमुख शिक्षक यांच्या उपस्थितीत
करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन गोळेगाव शाळेचे मुख्याध्यापक मोहन नाडेकर, शिक्षक उमेश शिंदे, किरण पवार, मारुती साबळे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय उगले यांनी केले. मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी आभार मानले