पुणे – सुरत येथे झालेल्या समारंभात गृह मंत्रालयातर्फे देण्यात येणारा राजभाषा वापरासाठीचा सर्वोच्च असा कीर्ती पुरस्कार बॅंक ऑफ महाराष्ट्रला प्रदान करण्यात आला. राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन व सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या दोन वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये बॅंकेला कीर्ती पुरस्कार बहाल करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी अमित शाह तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक व अजय कुमार मिश्रा यांचा सत्कार केला. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व राजभाषा विभागाचे सरव्यवस्थापक के राजेश कुमार यांनी राजभाषेचे प्रभावी कार्यान्वयन या वर्गवारीमध्ये तर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या राजभाषा विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ राजेंद्र श्रीवास्तव यांनी सर्वोत्तम अंतर्गत मासिक पत्रिका या वर्गवारीमध्ये राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारला.