दुबई – आयपीएल स्पर्धेत आज आणखी एक रोमहर्षक मुकाबला रंगणार आहे. द्विशतकी धावांचा यशस्वी पाठलाग करणारा राजस्थान रॉयल्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
राजस्थान विरूध्द कोलकाता यांच्यातील रोमहर्षमक सामन्यास काही वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने क्षेत्ररक्षण स्विकारलं असून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
.@rajasthanroyals have won the toss and they will bowl first against @KKRiders.#RRvKKR #Dream11IPL pic.twitter.com/MoDg7jCn5B
— IndianPremierLeague (@IPL) September 30, 2020
दरम्यान, राजस्थानने यंदाच्या स्पर्धेत आजवर झालेल्या सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. कोलकाताबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या संघाला अद्याप एकच विजय मिळवता आला आहे.