अजमेर – राजस्थानच्या अजमेर मध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबल व डीएसपी हीरालाल सैनी यांना निलंबीत केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अजमेरमधील बेवार येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल डीएसपी हिरालाल सैनीसह जलतरण तलावात आंघोळ करताना दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जलतरण तलावाच्या बाहेर महिला कॉन्स्टेबलचा सहा वर्षांचा मुलगाही होता. असे असूनही दोघेही मुलासमोर समोर अश्लील कृत्य करत होते.
व्हिडिओ समोर आल्यानंतर झाली होती अटक
व्हिडिओ समोर आल्यानंतर डीएसपी हिरालाल सैनी यांना 9 सप्टेंबरला आणि महिला कॉन्स्टेबलला 12 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. दोघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले होते.
काय आहे प्रकार
डीएसपीचे स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. एका रिसॉर्ट मध्ये डीएसपी व महिला कॉन्स्टेबल स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करत असताना पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला होता. त्यानंतर डीएसपीसा अटक करण्यात आली होती.