आबूधाबी – कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध कस लागणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या बेंगळुरू संघाला यंदा तरी सरस कामगिरी करता येणार का हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेंगळुरू विरूध्द राजस्थान या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीची (टाॅस) कौल राजस्थान राॅयल्सच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Steve Smith wins the toss and elects to bat first against #RCB.#Dream11IPL #RCBvRR pic.twitter.com/ZYLtMIVYQG
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2020
दरम्यान, या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात बेंगळुरू संघाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अपयश आले आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना याच ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला आहे. त्यातून काहीतरी बोध घेउन ते सरस कामगिरी करतील का हेच या सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. याउलट राजस्थानचा संघ सातत्याने एकेका सामन्यात सरस कामगिरी करत आहे.