अहमदाबाद : आयपीएल 2022 चा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 70 लीग सामने, दोन महिन्यांच्या कालावधीत तीन प्लेऑफ सामने, आता विजेतेपदाच्या सामन्याची पाळी आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघात जेतेपदासाठी रॉयल लढत होणार आहे.
राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी बेंगळुरूचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. राजस्थानचा संघ तब्बल 14 वर्षानंतर पुन्हा एकदा जेतेपदावर नाव नोंदविण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर गुजरात टायटन्स पदार्पणात इतिहास रचण्याच्या उद्देशाने खेळेल.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( Rajasthan Royals won the toss and elected to bat ) गुजरात संघाने आजच्या सामन्यात एक बदल केला आहे. अल्झारी जोसेफ यांच्याजागी लोकी फर्ग्युसनचा संघात समावेश केला आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
🚨 Toss Update 🚨@IamSanjuSamson has won the toss & @rajasthanroyals have elected to bat against the @hardikpandya7-led @gujarat_titans in the summit clash.
Follow The Final ▶️ https://t.co/8QjB0b5UX7 #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/AGlMfspRWd
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीप्रमाणे :-
गुजरात टायटन्स प्लेइंग 11 :- शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (c), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी.
Final.Gujarat Titans XI: S Gill, W Saha (wk), M Wade, H Pandya (c), D Miller, R Tewatia, R Khan, L Ferguson, M Shami, Y Dayal, S Kishore. https://t.co/8QjB0b5UX7 #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11 :- जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (c), देवदत्त पड़िक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल.
Final.Rajasthan Royals XI: J Buttler, Y Jaiswal, D Padikkal, S Samson (c/wk), R Parag, S Hetmyer, R Ashwin, O Mccoy, T Boult, P Krishna, Y Chahal. https://t.co/8QjB0b5UX7 #Final #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
दरम्यान, राजस्थानन 2008मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी त्यांनी एम.एस. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिला आयपीएल विजेता होण्याचा मान पटकावला होता. पण त्यानंतर 14 वर्षे राजस्थानला अंतिम सामना गाठण्यात अपयश आले.
अखेर ही प्रतिक्षा शुक्रवारी संपली आणि राजस्थानने अंतिम सामन्यात प्रवेश केला. राजस्थानची आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. तर त्यांचा सामना ज्या संघाविरुद्ध होणार आहे, तो गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे.