#IPL2020 : राजस्थान रॉयल्सने टाॅस जिंकला

शारजा –आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य दिल्ली कॅपिटल्स संघाशी राजस्थान रॉयल्सचा सामना होत आहे. या सामन्यात दिल्लीच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर उभे ठाकले आहे.

राजस्थान विरूध्द दिल्ली यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात शारजा येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा राजस्थानच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने क्षेत्ररक्षण स्विकारताना दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत दिल्लीने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळविला आहे, तर राजस्थान राॅयल्सला 5 पैकी 2 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.