#IPL2019 : राजस्थान आणि दिल्ली आज समोरासमोर

राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली कॅपिटल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – सवाई मानसिंग मैदान, जयपूर

जयपूर – आयपीएलच्या बाराव्या मोसमात आता पर्यंत आपल्या चांगल्या खेळामधून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सातत्याने स्थान राखणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर कर्णधार बदलानंतर विजयाची चव चाखायला मिळालेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असून आजचा सामना जिंकूण प्ले ऑफच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकण्यास दिल्लीचा संघ उत्सूक असून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्याचे उद्दिष्ट राजस्थान रॉयल्स संघासमोर असणार आहे.

यंदाच्या मोसमात आपल्या दहा सामन्यंपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून 12 गुणांसह दिल्लीचा संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून दिल्लीने आतापर्यंत मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पंजाबच्या संघांचा पराभव केला असून त्यांना मुंबई, पंजाब, हैदराबाद आणि चेन्नई विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे 12 गुण झालेले असून त्यांना प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यासाठी आणखीन चार गुणांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे ते आजचा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकण्यास उत्सूक असणार आहेत.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाला यंदाच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याने ते क्रमवारीत खालून दुसऱ्या स्थानी आहेत. यंदाच्या मोसमात त्यांनी आपल्या नऊ सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यात विजय मिळवला असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. यावेळी त्यांनी बंगळुरू आणि मुंबईचा पराभव केला असून त्यांना पंजाब, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

त्यातच त्यांच्या संघाने अजिंक्‍य रहाणेला कर्णधार पदावरून हटवून त्याच्या जागी स्टिव्ह स्मिथला कर्णधार केल्यानंतर त्यांनी लागलीच मुंबई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले असले तरी आजच्या सामन्यात जर त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.