#IPL2019 : राजस्थान रॉयल्सला विजय अनिवार्य

चेन्नईचा अडथळा पार करत विजयी मार्गावर परतण्यास राजस्थान उत्सूक

आजचा सामना

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – सवाई मानसिंग मैदान, जयपुर.

जयपुर  – पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करुनही काही चुकांमुळे अखेरच्या क्षणी पराभव पत्करून गुणतालीकेत खालून दुसऱ्या स्थानी असणाऱ्या राजस्थान रॉयल्स समोर आज गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असून चेन्नईचा पराभव करत विजयीमार्गावर परतण्यास राजस्थानचा संघ उत्सूक असणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच चांगली कामगिरी केली आहे. त्यात त्यांच्या फलंदाजांपासून ते गोलंदाजपर्यंत सर्वांनीच आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत केले होते. मात्र, नेमके अखेरच्या क्षणी अतिरिक्त दबाव स्विकारत केलेल्या चुकांमुळे राजस्थनच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यात केवळ क्रमवारीत तळाच्या स्थानी असणाऱ्या बंगळुरू विरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील एकमेव विजय त्यांनी पटकावला आहे. यावेळी राजस्थानचा संघ पाच सामन्यांमध्ये 4 पराभव आणि एक विजय मिळवत दोन गुणांसह क्रमवारीत सातव्या स्थानी आहे.

तर, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानी असून त्यांनी आपल्या सहा सामन्यांमध्ये 5 विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. ज्यातील त्यांच एकमेव पराभव हा मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेला असून इतर सर्व सामन्यांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे आजच्या सामन्याचा विचार करता चेन्नईच्या संघाकडे उत्कृष्ठ फलंदाज आणि गोलंदाजांची फळी असून त्यांच्या इम्रान ताहिर, दिपक चहर आणि हरभजन सिंगने प्रतिस्पर्धी संघांमधील फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले असून हे तिन्ही गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या दहा गोलज़ंदाजांमध्ये आपले स्थान पटकावून आहेत.

यावेळी राजस्थानचा संघ संपुर्णपणे जोस बटलर आणि जोफ्रा आर्चरयांच्यावर विसंबून असल्याचे भासत असून हे दोघे चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले तर संपुर्ण संघाचा डाव कोलमडलेला दिसून येतो आहे. त्यांच्याकडे अजिंक्‍य रहाणे, स्टिव्ह स्मिथ सारखे फलंदाजा सूनही केवळ एखादा दुसरा सामना वगळता इतर सामन्यांमध्ये चांगली काअमगिरी करण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघाचे पारडे निश्‍चीतच जड असल्याचे भासते आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.