#IPL2019 : मुंबई इंडियन्सचे राजस्थान राॅयल्ससमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान

मुंबई – क्विंटन डी कॉकच्या 81 आणि कर्णधार रोहित शर्माच्या 47 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान राॅयल्ससमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान ठेवले आहे.

नाणेफेक जिंकून राजस्थानने मुंबई संघास प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले. मुबंईने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावां केल्या. क्विंटन डी कॉकने 52 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारासह सर्वाधिक 81 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3 तर जयदेव उनादकट आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा राजस्थान संघाने 6 षटकांत बिनबाद 59 धावा केल्या आहेत. अंजिक्य रहाणे 37 आणि जोस बटलर 21 धावांवर खेळत आहेत. राजस्थानला जिंकण्यासाठी 84 चेंडूत आणखी 129 धावांची आवश्यकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.