#IPL2020 : राजस्थानचा कर्णधार स्मिथला 12 लाखांचा दंड

आबूधाबी – इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आणखी एक झटका बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्या दरम्यान षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी  (स्लो ओवर रेट) 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

इंडियन प्रीमियर लीगने एक निवेदन जारी करून सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल माहिती दिलीआहे. ‘राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला अबूधाबी येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात षटकांची गती कायम न राखल्यामुळे (स्लो ओवर रेट) आयपीएलच्या नियमांनुसार दोषी ठरल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

स्टीव्ह स्मिथ हा पहिला कर्णधार नाही जो या हंगामात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला आहे. याआधीही आयपीएलच्या 13 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही षटकांची गती कायम न राखल्यामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.