प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – राजस्थान-जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा यात्रेसाठी पुण्यातील श्री बाबा रामदेव सोशल ग्रुप 1,300 किलोमीटरची सायकलवारी करणार आहे. रूनेचा धामपर्यंत एकूण 10 दिवसांत ही वारी पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये एकूण 28 सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला आहे.
या प्रवासासाठी सायकलींचे सहकार्य महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे संस्थापक स्व. धनराज राठी यांच्या स्मरणार्थ मैनाबाई धनराज राठी आणि परिवाराने केले आहे. या सायकल वाटपावेळी मगनराज राठी, धनराज भाटी, अविनाश कोठारी, मांगीलाल परिहार, मगराज राठी, महावीरसिंह शेखावत, शैलेश चौधरी, महेंद्र छाजेड, अनिल लखन, चुन्नीलाल राठी, राजेश राठी उपस्थित होते.
भाद्रपदमध्ये दरवर्षी राजस्थानमध्ये ही यात्रा भरते. यंदा या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष आहे. पुणे-लोणावळा-मुंबई-सुरतमार्गे ही सायकलवारी राजस्थानमध्ये पोहोचेल. दररोज साधारणतः 130 ते 140 कि.मी.चा प्रवास करण्यात येणार आहे, अशी माहिती मगराज राठी यांनी दिली.
10 दिवसांचा प्रवास : एकूण 1,300 कि.मी.चे अंतर