राजस्थान कॉंग्रेस उपाध्यक्षांची उचलबांगडी

जयपूर -राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मुमताज मसिह यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. ते गेले वीस वर्षे या पदावर होते. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे राजस्थान प्रदेश कॉंग्रेसमध्ये सध्या बंडाळी माजली असून ती रोखण्यात अपयश आल्याचा ठपका मसिह यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सध्या राजस्थान कॉंग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट गटाने दंड थोपटले आहेत. गेहलोत यांच्याजागी सचिन पायलट यांची नियुक्‍ती करावी, अशी मागणी या गटातील काही आमदारांनी उघडपणे केली आहे. तर हा पक्षशिस्तीचा भंग असल्याचा आरोप गेहलोत गटाकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.