राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात हनी ट्रॅपची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक महिलेने एका मार्बल व्यापाऱ्याला सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. आतापर्यंत महिलेने या व्यापाऱ्यास धमकावून तब्बल 23 लाख रुपये घेतले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी महिलेसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
नागौर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी ढाणी, बुलडको, मकराना येथे राहणारा मार्बल व्यापारी न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर 23 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हा व्यापारी हरवल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलीसांनी त्या व्यापाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली व पोलीसांना त्यामध्ये यश आले मात्र व्यापाऱ्याची भेट घेतल्यानंतर व्यापारी आत्महत्या करणार असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांना तपासात समोर आला.
पीडित मार्बल व्यापाऱ्याने पोलिसांना आपली आपबीती सांगितली यामध्ये गुणावती येथील रेखा कंवर आणि शैतान सिंग यांनी त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन 23 लाख रुपये हडप केले. वास्तविक रेखा पती विक्रम सिंहसोबत झोपडीसारख्या घरात राहत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रेखाला मात्र आलिशान जीवन जगायचे होते. त्यामुळे मार्बल कंपनीत स्टोन कटरचे काम करणाऱ्या पतीला तिची इच्छा पूर्ण करता आली नाही. यानंतर रेखाने आपल्या सौंदर्याचा फायदा घेण्याचे ठरवले व त्यानूसार पैसे कमविण्याचा प्लॅन केला.
त्यानंतर तीन वर्षांपूर्वी ती एका मार्बल व्यापाऱ्याच्या संपर्कात आली. तिने हळू-हळू त्या व्यापाऱ्याला सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले. रेखाचा मित्र शैतान सिंग याने या कटाला पाठिंबा दिला. रेखाने मार्बल व्यापाऱ्यासोबत शारिरीक संबंध ठेवत असताना व्हिडिओ शूट केला आणि शैतान सिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने तिला आधी 23 लाख रुपये दिले. असे असूनही रेखाचा लोभ वाढतच गेला. त्यानंतर पुन्हा 50 लाखांची मागणी केली. दरम्यान रेखाच्या या जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्येचा मार्ग निवडला. तत्पूर्वी, त्याने आपल्या बहिणीला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर दोन्ही भाऊ-बहीण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि या प्रकरणाची माहिती देत महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली.