मॅरेज अॅनिव्हर्सरीला पतीनं पत्नीला दिलं अनोखं गिफ्ट; चंद्रावर खरेदी केली 3 एक्कर जमीन

जयपूर – लोक बोलता बोलता चंद्रापर्यंतच्या गप्पा मारत असतात. मात्र, राजस्थानमधील एका व्यक्तीने स्वप्न सत्यात उतरवले असून मॅरेज अॅनिव्हर्सरीदिवशी पत्नीला चक्क चंद्रावर 3 एक्कर जमीन गिफ्ट दिली आहे.

अजमेर येथील धर्मेंद्र अनीजा यांनी लग्नाच्या आठव्या अॅनिव्हर्सरीनिमित्त चंद्रावर 3 एक्कर जमीन गिफ्ट देऊन अनोख्या प्रकारे पत्नी सपनावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

‘लग्नाच्या आठव्या अॅनिव्हर्सरीनिमित्त पत्नी सपनासाठी काही खास करायचे होते. त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी केली. अमेरिकेतील न्यूयाॅर्कमधील एका इंटरनॅशनल फर्म लूना सोसायटी च्या माध्यमातून ही जमीन खरेदी केली असून खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. चंद्रावर जमीन खरेदी करणारा राजस्थानमधून मी पहिला व्यक्ती असेल. मला खूप आनंद होत आहे,’ असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

अनेख्या गिफ्टमुळे सपना खूप खूश झाल्या आहेत. ‘मी खूप खूश आहे, पृथ्वीच्या बाहेरील गिफ्ट मिळेल अशी कल्पनाही नव्हती’, असे सपना यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.