राजस्थानमध्ये अल्पवयिन मुलीवर सामूहिक बलात्कार

जयपूर: राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात अल्पवयिन मुलीचे अपहरणकरुन सामुहीक बल्त्कार करण्यात आल्याची धक्‍कादायक घटणा उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी आपल्या दोन मित्रांसोबत मंदिरामध्ये जात होती. त्याचवेळी आरोपींनी तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी जयपूरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या भीलवाडा जिल्ह्यात घडली आहे. पीडित मुलगी आपल्या मित्रांसोबत मंदिरामध्ये जात होती. त्याचवेळी रस्त्याच्याकडेला तिन्ही आरोपी दारु पित बसले होते. आरोपींनी पीडित मुलीला पाहताच तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिचे अपहरण करन निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी घाबरलेल्या पीडित मुलीच्या एका मित्राने पळत जाऊन गावातील एका व्यक्तीला सांगितले. त्यानंतर दोघेही गाडी घेऊन घटनास्थळी पोहचले त्यावेळी आरोपी पीडित मुलीला मारहाण करत होते. गाडी आलेली पाहताच आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीला दोघांनी घरी नेऊन सोडले.
दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामधील दोन जणांचे वय 20 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे नाव राजू काहर आणि कैलाश काहर आहे. तर तिसऱ्या व्यक्तीचे नाव नारायण गुर्जर असून तो 40 वर्षाचा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)