भिलवाडा -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सहाडा विधानसभा मतदारसंघातील ज्योतिषनगरी कारोही येथे पोहोचले.
भिलवाडा लोकसभा मतदारसंघासाठी रिंगणात असलेल्या कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. यावेळी एनएसयुआय कार्यकर्त्यांनी वाईट नजरेपासून बचावासाठी गहलोत यांना लिंबू-मिरचीचे हार घातल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.