जयपूर – ‘आई मी जात आहे, माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे’ असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना राजस्थान मधीन बारामधील जलवाडा नगरात घडली आहे. या तरूणाची आई खोलीत गेली असता तिला लटकलेल्या अवस्थेत तिचा मुलगा आढळून आला.
ओमप्रकाश मेघवाल, वय 24 असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाने नाव असून पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आत्महत्येपूर्वी ओमप्रकाशने एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते, ज्यामध्ये ‘आई मी जात आहे, माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे’. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांने सांगितले आहे.
ओमप्रकाश ई-मित्र दुकान चालवायचा. चहा पिल्यानंतर सोमवारी रात्री तो त्याच्या खोलीत गेल्या त्यानंतर त्याने 12 वाजून 4 मिनिटांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले. स्टेटस ठेवल्यानंतर त्याने रात्री उशीरा त्याच्या खोलीत गळफास घेतला. सकाळ झाल्यानंतर ओमप्रकाशची आई त्याच्या खोलीत आली तेव्हा त्याच्या आईला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पुढिल तपास पोलिस करत आहेत.