नवी दिल्ली : राजस्थानच्या पाली जवळ आज पहाटे ३ च्या सुमारास ‘सूर्यनगरी एक्सप्रेस’चे ११ डबे रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून १० प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
11 coaches were impacted due to derailment of Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express train. No casualties reported yet. Higher officials have reached spot. Buses have been arranged for stranded passengers so that they can reach their destinations: CPRO, North Western Railway pic.twitter.com/U4ZoM1YlrI
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 2, 2023
दरम्यान, या अपघातानंतर उत्तर-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांच्या मदतीसाठी ०२९१- २६५४९७९(१०७२), ०२९१- २६५४९९३(१०७२), ०२९१- २६२४१२५, ०२९१- २४३१६४६ हे हेल्पलाईन क्रमांकही रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.