श्रीलंकेमध्ये राजपक्षे यांच्या पक्षाला बहुमताची चिन्हे

कोलोंबो – श्रीलंकेमध्ये राजपक्षे कुटुंबीयंच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मतमोजणीच्या प्राथमिक निष्कर्शानुसार या पक्षाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. 

“एसएलपीपी’पक्षाला विरोधकांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार एकूण्‌ 16 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये या पक्षाला 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. प्रामुख्याने सिंहली समुदायाची मते या पक्षालाच मिळाली असल्याचे स्पष्ट होते आहे. सिंहली समुदायाचे प्राबल्य असलेल्या दक्षिणेकडे या पक्षाने बाजी मारल्याचे दिसते आहे. “एसएलपीपी’ने 16 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. 

गॅले जिल्ह्यामध्ये “एसएलपीपी’ने लढवलेल्या नऊ पैकी सात जागा जिंकल्या आहेत. तर शेजारच्या मातारा जिल्ह्यात या पक्षाने लढवलेल्या 7 पैकी 6 जागा जिंकून आणखी चांगली कामगिरी केली आहे.

“श्रीलंका पीपल्स पार्टी’चे निकटचे प्रतिस्पर्धी, अध्यक्षपदाचे माजी उमेदवार आणि याच पक्षातून बाहेर पडलेल्या सजित प्रेमदासा यांनी स्थापन केलेला नवीन पक्ष. माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचा “युनायटेड नॅशनल पार्टी’ हे पक्ष अगदी पराभवाच्या छायेत आहेत. या पक्षांन तर “मार्क्‍सिस्ट जनता विमुक्‍थी पेरामुना’ या पक्षापेक्षाही कमी जागा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. “एसजेबी’ने दोन्ही जिल्ह्यांमधून केवळ तीन जागा जिंकल्या आहेत. 

इतर जिल्ह्यांमधील मतदान प्रभागात मतमोजणीचे काम सुरू आहे. “एसएलपीपी’ने निर्विवादपणे आघाडी घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तामिळ अल्पसंख्यांक असलेल्या उत्तरेकडील “तामिळ नॅशनल अलायन्स’ने काही विभाग जिंकूनही “एसएलपीपी’चा तामिळ सहकारी पक्ष “एलाम पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’कडून अनपेक्षितपणे पराभव स्वीकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.