नाशिकसह मुंबईतील याठिकाणी होणार ‘राज’गर्जना

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांच्या मुंबई मध्ये तीन सभा होणार आहेत. मंगळवार २३ एप्रिल रोजी काळाचौकी येथे पहिली सभा होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी २४ एप्रिलला भांडुप, गुरुवार २५ एप्रिलला पनवेल येथे राज ठाकरेंची सभा होणार आहे. आणि शुक्रवार २६ एप्रिल रोजी नाशिक येथे राज ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाडनंतर राज ठाकरे यांची मुंबईत सभा पार पडणार आहे.

याआधी, निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली “एक खिडकी यंत्रणा’ आणि मुंबई महापालिका यांच्याकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीसाठी दि. 18 एप्रिल रोजी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नसल्याने महापालिकेकडून परवानगी घ्यावी, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून परत पाठवले, अशी माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली होती.

.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.