पुणे : आपल्या कार्यकर्त्याने घेतलेली गाडी चालवून राज ठाकरे यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. या अनोख्या शुभेच्छांनी हा कार्यकर्ता भलताच भारावून गेला आहे.
विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार आहेत. त्यासाठी पुण्यात आलेल्या ठाकरें यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष सचिन ननावरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कार घेतली त्याचे उद्घाटन करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत राज यांनी त्याची गाडी चालवून त्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या नेत्याने आपल्या पहिल्या गाडीचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
राज ठाकरे यांची सभा आज पुण्यातील नातू बागेतील मैदानात हाेत आहे. त्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर त्यांनी मनसेचे काेथरुडचे उमेदवार किशाेर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले.