नोटाबंदीमुळे राज ठाकरेंचे दुकान बंद – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावरही साधला निशाणा
नाशिक – नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले आहे, असा टोला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या प्रचारसभेत लगावला. चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी होते असल्याने संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला आहे. नाशिकमध्ये आज झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावरही टीकेचे ताशेरे झाडले.

फडणवीस म्हणाले, निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन असलेले शरद पवार यांना मैदानात उतरण्याआधी मैदान सोडावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने इंजिन भाड्याने घेतले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले म्हणूनच त्यांचा जळफळाट झाला, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
आपल्याला ठाऊक आहेच की राज ठाकरे यांनी दहा सभा घेऊन मोदी आणि अमित शहा यांना हटवा, असें आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी त्यासाठी हरिसाल गाव डिजिटल कसं झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्नं दाखवूनही देशाला कसं फसवले हे आणि यासंदर्भातले व्हिडिओ त्यांनी सादर केले. या सर्व प्रश्‍नांवरून त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.