राज ठाकरेंच्या पोलखोलवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया !

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी  ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणणाऱ्या योजनेची काल पोलखोल केली. या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या फोटोतील संपूर्ण कुटुंबाला राज ठाकरेंनी स्टेजवर उपस्थित करत भाजपवर मोठा प्रहार केला.

दरम्यान, खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तावडे म्हणाले, राज ठाकरेंनी सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातींमधला नाही. तसेच हा फोटो कुठल्याच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाला नाही. हा फोटो एखाद्या मोदीप्रेमींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असू शकतो. अश्या प्रकारे फोटो वापरणे चुकीचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.