नवी दिल्ली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ‘राज ठाकरे’ सध्या दिल्ली आहे. ईव्हीएम घोटाळा प्रकरणी निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी राज ठाकरे कालच दिल्लीत दाखल झाले होते. तब्ब्ल 14 वर्षांनी राज ठाकरे दिल्लीत गेले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी राजकीय नेत्यांचीही भेट घेतल्याचं दिसून येत आहे.
Delhi: Maharashtra Navnirman Sena(MNS) Chief Raj Thackeray met UPA Chairperson Sonia Gandhi today pic.twitter.com/k8IpgPAX8u
— ANI (@ANI) July 8, 2019
निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी आज यूपीए अध्यक्षा ‘सोनिया गांधी’ यांची भेट घेतली आहे. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार का अश्या चर्च्यांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.