पुणे: आज दिवसभर तब्बल साडे आठ तास इडीच्या चौकशीला सामोरे जाऊन आल्यानंतर राज यांनी कृष्णकुंजया त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधत “अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही” आशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांचे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या वेळी राज यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.